एमबीबीएससाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशाच्या नावाने फसवणूक

शिक्षणासाठी मॅनेजमेंट कोट्यातून केईएम रुग्णालयात प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करून दोन व्यक्तींची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला
एमबीबीएससाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशाच्या नावाने फसवणूक

मुंबई : एमबीबीएस या शिक्षणासाठी मॅनेजमेंट कोट्यातून केईएम रुग्णालयात प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करून दोन व्यक्तींची १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉ. हितेन केनिया आणि हिना ऊर्फ शशिमा तिवारी या दोघांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. बोरिवलीत राहणारे धर्मांग मनसुखलाल डेडिया यांची मुलगी आणि त्यांचे मित्र जिमी देसाई यांचा मुलगा नीट परीक्षेची तयारी करत होते. धर्मांग यांना डॉ. हितेश यांनी केईएम रुग्णालयात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते. डॉ. हितेश यांनी हिना तिवारी आणि जीवक यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून १ कोटी १५ लाख रुपये घेतले होते. त्यांना नीट परीक्षेद्वारे प्रवेश मिळाला नाही, अखेर त्यांनी पैसे परत मागितले. मात्र टाळाटाळ होऊ लागल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in