ओएनजीसीचे कॅटरिंग कंत्राट देण्याच्या नावाने फसवणूक

३२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध साकिनाका पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
ओएनजीसीचे कॅटरिंग कंत्राट देण्याच्या नावाने फसवणूक

मुंबई : ओएनजीसीच्या कॅटरिंगचे कंत्राट देण्याच्या नावाने सुमारे ३२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध साकिनाका पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. महेंद्र यादव, राजेश देवीचंद्राकुमार यादव, गंगालाल गुजर आणि बी. के निराला अशी या चौघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ४६ वर्षांचे शंभू रवीदंत शर्मा यांच्या भावाला महेंद्र यादवने ओएनजीसी कंपनीमध्ये कॅटरिंगचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी ओएनजीसी कंपनीच्या कंत्राटाची जाहिरात दाखवून त्यांना टेंडरसाठी आधी ४० लाख रुपये जमा करावे लागतील असे सांगितले. या दोघांवर विश्‍वास ठेवून त्यांनी त्यांच्या कंपनीला टप्याटप्याने ३७ लाख रुपये दिले होते. हे कंत्राट अन्य कंपनीला मिळाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पैशांची मागणी केली. अखेर आरोपींनी साडेचार लाख रुपये परत केले. उर्वरित ३२ लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तोतया आयपीएस अधिकाऱ्यासह दोघांना अटक

मुंबई : केंद्रातील विविध शासकीय विभागात चांगली ओळख असल्याची बतावणी करून पोस्टिंगसाठी एक कोटीची मागणी करून सुमारे ३५ लाखांची फसवणुक करणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका तोतया आयपीएस अधिकाऱ्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली. गणेश शिवाजी चव्हाण आणि मनोज कपिंदर पवार अशी या दोघांची नावे असून ते दोघेही चेंबूरच्या वाशीनाका येथे राहतात. या दोघांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.

तक्रारदाराची काही दिवसांपूर्वी या दोघांशी ओळख झाली. आम्ही आयपीएस अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी लावण्याच्या हेतूने त्यांनी १ कोटींची मागणी केली होती. त्यातील ३५ लाख रुपये त्यांना दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in