डॉलरच्या नावाने फसवणूक; त्रिकुटास अटक

तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे
डॉलरच्या नावाने फसवणूक; त्रिकुटास अटक

मुंबई : डॉलरच्या नावाने फसवणूक करणाऱ्या एका त्रिकुटाला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. रिंकू आबू ताहिर शेख, मोहम्मद रेकाऊल अब्दुल रेहमान हक आणि जमीदार आयनुल शेख अशी या तिघांची नावे असून, ते तिघेही झारखंडचे रहिवाशी आहेत. या गुन्ह्यात सिटू ऊर्फ सलीम याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजीव हरिश्‍चंद्र जैस्वाल हा तरुण ठाणे येथे राहतो. काही दिवसांपूर्वी या आरोपींनी राजीवला संपर्क साधून त्यांच्याकडे साडेचार लाख रुपयांचे डॉलर आहे. ते डॉलर त्याला दीड लाखांमध्ये देतो, असे आमिष दाखवून वांद्रे येथे बोलाविले होते. त्यामुळे राजीव हा मंगळवार, १२ सप्टेंबरला वांद्रे, खेरवाडी परिसरात दीड लाख रुपये घेऊन आला होता. यावेळी तिथे आलेल्या चार जणांच्या टोळीने त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील दीड लाख रुपये घेऊन त्याला रुमालात पेपर कात्रण देऊन पलायन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in