सोने देण्याच्या आमिषाने दहा कोटीची फसवणुक

१० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अक्षय दीपक देसाई या आरोपीला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली
सोने देण्याच्या आमिषाने दहा कोटीची फसवणुक

मुंबई : कस्टमने जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका महिलेसह तिच्या परिचित नातेवाईकांची सुमारे १० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अक्षय दीपक देसाई या आरोपीला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात श्‍वेता अनिल बडगुजर, दर्शन दीपक देसाई आणि स्वाती प्रकाश जावकर यांचा समावेश आहे. नूतन प्रसाद आयरे हिला तिची मैत्रीण स्वाती आणि श्वेता बडगुजर यांनी कस्टमने जप्त केलेले सोने लिलावात स्वस्तात मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. तिच्यावर विश्‍वास ठेवून तिने तिला सोन्यासाठी ५० लाख रुपये दिले होते. टप्याटप्याने तिला १ कोटी ८४ लाख रुपये दिले होते. तिच्या परिचितांनीही ९ कोटी ८६ लाख ५० हजार रुपये दिले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी श्वेतासह अक्षय देसाई यांच्याविरुद्ध डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in