फ्लॅटच्या नावाने वयोवृद्धाची अडीच कोटींची फसवणूक

इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन त्यांना रुमचा ताबा देण्यात आला नाही
फ्लॅटच्या नावाने वयोवृद्धाची अडीच कोटींची फसवणूक

मुंबई : मालकी हक्काचा फ्लॅट असताना पुर्नविकास इमारतीमध्ये फ्लॅटचा ताबा न देता एका ६७ वर्षांच्या वयोवृद्धाची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जागेच्या मालकाविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हिमांशू बाबूलाल शहा आणि सनी बाबूलाल शहा अशी या दोघांची नावे असून, या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. ६७ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार उमेश बच्छूभाई शहा असून, १७ वर्षांपूर्वी त्यांनी पगडी सिस्टीम असलेल्या विलेपार्ले येथील राममंदिर रोडवरील यशवंत भवनमध्ये एक रुम खरेदी केली होती. या इमारतीचे मालक बाबूलाल शहा असून, रुम खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी त्यांनी हिमांशू आणि सनी शहा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर ते त्यांनाच त्यांच्या रुमचे नियमित भाडे देत होते. ही इमारत मोडकलीस आल्याने इमारतीचे पुर्नविकास करण्यात आले; मात्र या नवीन इमारतीमध्ये त्यांना रुम न देता त्याच परिसरात बांधकाम सुरू असलेल्या दुसऱ्या इमारतीमध्ये रुम देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते; मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन त्यांना रुमचा ताबा देण्यात आला नाही.

logo
marathi.freepressjournal.in