

मुंबई : पुरातन काळातील श्रीकृष्णाची मूर्ती विक्री व्यवहारात एका व्यावसायिकाची भामट्याने सुमारे २७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अमोल बाळू सोनावणे या भामट्याचा शोध सुरू केला आहे. तक्रारदाराला त्याच्या मित्रांनी अमोलशी ओळख करून दिली होती. आपल्याकडे प्राचीन काळातील श्रीकृष्णाची पुरातन मूर्ती असून त्याची किंमत १ कोटी रुपये आहे. परदेशात या मूर्तीला मोठा मागणी आहे, असे अमोलने सांगितले होते. अखेर मूर्तीसाठी २७ लाख ५२ हजार रुपये अमोलला दिले. मात्र १५ दिवसांनंतरही मूर्ती न दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बांगुरनगर पोलिसात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.