व्यावसायिकाच्या कंपनीची सायबर ठगाकडून फसवणुक

प्रकार लक्षात येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती
व्यावसायिकाच्या कंपनीची सायबर ठगाकडून फसवणुक

मुंबई : शहरातील एका नामांकित कंपनीच्या महिला व्यावसायिकाच्या नावे मेल पाठवून कंपनीची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस मेल पाठवून कंपनीच्या व्यवस्थापकाने पाठविलेल्या ४ लाख ८० हजाराचा या ठगाने अपहार केला. याप्रकरणी डी. बी मार्ग पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु आहे. ७१ वर्षांचे मनोज शहा हे शीतल ट्रेडिंग ऍण्ड इंडिरिअर प्रायव्हेट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला असून या कंपनीच्या मालक शीतल भगत या आहेत. त्यात प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना शीतल भगत यांच्याकडून एक मेल आला होता. त्यात त्यांना एका बँक खात्यात ४ लाख ८० हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते.

या मेलवर शीतल भगत असे युजर आयडी असल्याने त्यांनी कुठलीही शहानिशा न करता संबंधित बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा असाच एक मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांनी शीतल भगत यांना संबंधित स्क्रिनशॉप पाठवून दिले होते. यावेळी तिने त्यांना मेल करुन पैसे पाठविण्यास सांगितले नाही असे सांगितले. त्यांच्या ईमेलवरुन अज्ञात सायबर ठगानी मेल पाठवून कंपनीची ही फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी या ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in