निवृत्त पोलीस हवालदाराची फसवणूक

खात्यातून ५० हजार रुपये डेबिट झाल्याचे मॅसेज आले
निवृत्त पोलीस हवालदाराची फसवणूक

मुंबई : डेबिट कार्डची अदलाबदल करुन एटीएममधून ५० हजार रुपये काढून एका निवृत्त पोलीस हवालदाची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. संभवकुमार ऊर्फ शंभू कृष्णा आचार्य असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. लक्ष्मण बाबूराव शिरसाट (६०) हे अंधेरीत राहत असून ते पोलीस हवालदार म्हणून निवृत्त झाले आहेत. १० जुलैला एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममधून बाहेर जात असताना एका तरुणाने त्यांच्या कार्डची अदलाबदली केली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये डेबिट झाल्याचे मॅसेज आले. बँकेत जाऊन खातरजमा केली असता, त्यांचे कार्ड बदली झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in