फ्लॅटसाठी ४६ लाख घेऊन वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणूक

या आरोपी व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
फ्लॅटसाठी ४६ लाख घेऊन वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणूक

मुंबई : फ्लॅटसाठी सुमारे ४६ लाख रुपये घेऊन एका वयोवृद्ध व्यावसायिकाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड बांधकाम व्यावसायिकाला पंतनगर पोलिसांनी अटक केली. नीरज मनसुखलाल वेद असे या आरोपी व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. निरज वेद हा व्हाईट कॉलर गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दहाहून अधिक अपहारासह फसवणुक व इतर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील तीन गुन्ह्यांत तो वॉण्टेड आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in