कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने सव्वाआठ लाखांची फसवणूक

फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच मिलिंद मालुसरे याने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.
कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने सव्वाआठ लाखांची फसवणूक

मुंबई : गोरेगाव येथील फ्लॅटसाठी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका तरुणाकडून घेतलेल्या सुमारे सव्वाआठ लाखांचा अपहार करून फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी निकेत अंकुश कासारे या आरोपीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. मिलिंद मालुसरे हा गोराई परिसरात राहत असून, गेल्या वर्षी त्याने गोरेगाव येथे एक फ्लॅट पाहिला होता. या फ्लॅटसाठी त्याला गृहकर्जाची गरज होती. याच दरम्यान त्याची निकेत कासारे याच्याशी ओळख झाली होती. त्याने फ्लॅटवर गृहकर्ज मिळवून देण्याचे आश्‍वासन देऊन त्याचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. दोन आठवड्यानंतर त्याने त्याला गृहकर्जासाठी बँक मॅनेजरला काही रक्कम द्यावे लागतील असे सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याने त्याला टप्याटप्याने आठ लाख तीस हजार रुपये दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत त्याने बँकेतून त्याल गृहकर्ज मिळवून दिले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्याला सतत टाळत होता. त्यामुळे त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरू केली होती. फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच मिलिंद मालुसरे याने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in