मुंबई : विविध आकर्षक योजनेच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुंतवणुकदासह कंपनीच्या एजंटच्या तक्रारीवरून आरएके मार्ग पोलिसांनी खासगी कंपनीच्या चौदा संचालकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. अरुण गांधी, हेमंत गणपत रेडीज, अभिनंदन अरुण गांधी, मानसी हेमंत रेडीज, आदित्य हेमंत रेडीज, विनायक रामचंद्र गावणंग, मनोहर शिगवण, अविनाश डांगळे, दिव्येश चंदराणा, अनिल येसरे, विनोद जगताप, माधुरी खुतड, कमलकर गोरीवले आणि अमृत म्हसकर अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या संचालकांनी गेल्या बारा वर्षांत १०० ते १५० कोटींची गुंतवणूक झाल्यानंतर पलायन केले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास आर्थिक शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.