स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने पाचजणांची फसवणुक ; गुन्ह्यांतील महिलेस चार महिन्यानंतर अटक

या इमातीमध्ये बरेच फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असून, त्याला तिथे ५५० चौ. फुटाचा सोळा लाखांमध्ये फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले होते.
स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने पाचजणांची फसवणुक ; गुन्ह्यांतील महिलेस चार महिन्यानंतर अटक

मुंबई : स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने पाचजणांची फसवणुक केल्याप्रकरणी संजना ऊर्फ सौजना संजय धुरी या महिलेस चार महिन्यानंतर दहिसर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. रिक्षाचालक असलेले करम सनिका सोय हा मूळचा झारखंडचा रहिवाशी आहे. सध्या तो त्याच्या काही गावच्या मित्रांसोबत दहिसर येथे राहतो. ऑक्टोंबर २०१९ रोजी त्याची संजनासोबत ओळख झाली होती. संजना ही नायगाव परिसरात अनेकांना स्वस्तात फ्लॅट देत असल्याची माहिती त्याला समजली होती. त्याला मुंबईत स्वतचे घर घ्यायचे होते. त्यामुळे त्याने तिला स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याची विनंती केली होती. काही दिवसांनी ती त्याला घेऊन नायगाव येथील पवित्रधाम सोसायटीमध्ये आली होती. या इमातीमध्ये बरेच फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असून, त्याला तिथे ५५० चौ. फुटाचा सोळा लाखांमध्ये फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in