हज यात्रेच्या नावाने २४ लाख रुपयांची फसवणूक

या पाचही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वसीम इझरोल मुस्तर हे कोलकाताचे रहिवाशी असून कापड व्यापारी आहेत.
हज यात्रेच्या नावाने २४ लाख रुपयांची फसवणूक

मुंबई : वाजवी दरात हज यात्रेच्या नावाने सुमारे २४ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध चेंबूर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. शाहबाज अलीमोहम्मद इम्तियाज अली, मोहम्मद सलीम कुरेशी, सलमा मोहम्मद सलीम कुरेशी, रशीद कुरेशी आणि सईदा कुरेशी ऊर्फ सबा अशी या पाचजणांची नावे आहेत.

या पाचही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वसीम इझरोल मुस्तर हे कोलकाताचे रहिवाशी असून कापड व्यापारी आहेत. मार्च महिन्यांत ते त्यांच्या झारखंड येथील बहिणीकडे गेले होते. तिथेच त्यांची ओळख शाहबाजशी झाली होती. त्याच्या बोलण्यातून त्याने अनेकांना हज यात्रेसाठी पाठविल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी त्याला त्यांच्या गावातील लोकांना हज यात्रेसाठी पाठविण्याची विनंती केली होती. यावेळी शहाबाजने त्यांना मोहम्मद सलीम कुरेशीचे एक व्हिझीटिंग कार्ड दिले होते. तो चेंबूर परिसरात राहत असून, त्याची अल कुरेशी ट्रॅव्हेल्स नावाचा व्यवसाय आहे. ते गरजू लोकांना वाजवी दरात यात्रा करून चांगले आणि पुण्याचे काम करतात असे सांगितले होते.

त्यामुळे ते मुंबईत आले आणि त्यांनी मोहम्मद सलीमची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी ४० जणांसाठी हज यात्रेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. यावेळी त्याची पत्नी सलमाने त्यांचे कुटुंबीय ३० वर्षांपासून ते काम करत असून अनेकांना हज यात्रेसाठी पाठविले आहे. त्याच्या राहण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलची, ट्रेन आणि विमानाची व्यवस्था करून दिली आहे, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना ४० लोकांसाठी सुमारे २४ लाख रुपये दिले होते. तसेच त्यांचे पासपोर्ट त्यांच्या स्वाधीन केले होते.

logo
marathi.freepressjournal.in