बोगस ज्वेलरी तारण ठेवून ४३ लाख रुपयांची फसवणूक

याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी कट रचून अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
बोगस ज्वेलरी तारण ठेवून ४३ लाख रुपयांची फसवणूक
Published on

मुंबई : पैशांची गरज असल्याची बतावणी करून बोगस ज्वेलरी तारण ठेवून एका ज्वेलर्स व्यापाऱ्याकडून घेतलेल्या सुमारे ४३ लाख रुपयांच्या कॅशसहीत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून फसवणूक झाल्याचा प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी कट रचून अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात कमलेश जैन याचे एक ज्वेलरी दुकान आहे.

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानात बनवारीलाल बंजारा नाव सांगणारा व्यक्ती एका महिलेसोबत आला होता. यावेळी त्याने त्याला पैशांची गरज असल्याचे त्याच्याकडील सोने गहाण ठेवून त्यांच्याकडे कर्जाने पैशांची मागणी केली होती. त्याने त्यांना एक अंगठी दिली आणि त्यामोबदल्यात वीस हजार रुपये घेतले होते. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत ते दोघेही त्यांच्या दुकानात सात ते आठ वेळा आले होते. त्याने त्याच्या खानदानी देवांच्या बोगस सोन्याच्या ५४ नग प्रतिमा गहाण ठेवून त्यांच्याकडे ४० लाखांची मागणी केली होती; मात्र त्यांच्याकडे कॅश नसल्याने त्याने त्यांच्याकडून १८ लाखांची कॅश आणि २५ लाख २२ हजार रुपयांचे २९७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे ४३ लाख २२ हजाराचा मुद्देमाल घेतला होता.

logo
marathi.freepressjournal.in