मुंबई : बँक खात्यातून ३ कोटी ६१ लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याचा ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असताना पत्नीने फ्लॅटची विक्री करून तिच्याच वयोवृद्ध पतीची सुमारे साडेतीन कोटीची फसवणूक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेणू सिंग ऊर्फ रेणू गिल या ६१ वर्षांच्या आरोपी पत्नीविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रेणूविरुद्ध दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले. ब्रिजेशपाल क्षेत्रपाल सिंग हे अंधेरी येथे राहत असून, ती टिव्ही मालिका बनवितात. त्यांचे त्यांच्या पत्नीशी घटस्फोट झाला असून, एका मुलाचे निधन झाले आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांची रेणूशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी तिच्याशी विवाह केला होता. त्यांच्यासोबत त्यांचा दुसरा मुलगा त्यांच्यासोबत राहत होता. ऑगस्ट २०२० साली ब्रिजेशपाल हे रेणूसोबत अंधेरीतील फ्लॅट सोडून मालाड येथील फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते. अक्षय वेगळा झाल्यानंतर रेणूने त्यांच्या वयोवृद्धासह आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या बँक खात्यातील ३ कोटी ६१ लाख रुपये स्वतच्या नावावर ट्रान्स्फर करून घेतली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत तिच्याविरुद्ध तक्रार केली होती