मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने महिलेसह दोघांची फसवणूक

मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने महिलेसह दोघांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने त्यांची बारा लाख दहा हजारांची तसेच मनपाचे बोगस नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केली होती.

मुंबई : मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने एका महिलेसह दोघांची सुमारे बारा लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अतुल राठोड ऊर्फ ईश्वर देविदास रुढे आणि सचिन तुकाराम खरडे या दोघांविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ४७ वर्षांची तक्रारदार महिला ही मालाड येथे राहत असून, डिसेंबर २०२१ तिची अतुल राठोडशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्याची महापालिकेत चांगली ओळख असून, तिच्या मुलाला मनपामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देतो असे सांगितले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने एका तरुणाला नोकरी दिल्याचे पत्र दाखविला होता. त्यामुळे तिने तिच्या मुलाला नोकरी मिळवून देण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने नोकरीसाठी साडेसहा लाख खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. या कामासाठी त्यांनी त्याला बारा लाख दहा हजार रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर काही दिवसांनी त्याने त्यांना दोघांचे अपॉइंटमेंट लेटर आणून दिले होते. त्यात मनपाचा स्टॅम्पसह प्रशासकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी होती; मात्र लेटर मिळवून या दोघांनाही नोकरीवर रूजू करण्यात आले नाही. अशा प्रकारे या दोघांनी नोकरीच्या आमिषाने त्यांची बारा लाख दहा हजारांची तसेच मनपाचे बोगस नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in