शाळेत प्रवेश देण्याची बतावणी करून महिलेची फसवणूक

शिफारशीतून तिच्या मुलीला नक्कीच प्रवेश मिळेल असे सांगितले
शाळेत प्रवेश देण्याची बतावणी करून महिलेची फसवणूक

मुंबई : शाळेत प्रवेश देण्याची बतावणी करुन एका महिलेची फसवणुक झाल्याचा प्रकार जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नेहा राजेश जोशी या महिलेविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. २८ वर्षांची तक्रारदार महिला ही जोगेश्‍वरी परिसरात राहत असून, तिचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहे. तिच्या चार वर्षांच्या मुलीसाठी त्यांनी अंधेरीतील होली स्पिरीट हॉस्पिटजवळील अरनॉल्ड स्कूलमध्ये ऑनलाईन अर्ज भरला होता. त्यानंतर तिच्या पतीने शाळेत जाऊन फॉर्म जमा केला होता. याच दरम्यान तिच्या परिचित नेहा जोशीने तिला शाळेत प्रवेश मिळाला नाहीतर ती स्वत:ला शाळेत प्रवेश मिळवून देईल, असे सांगितले होते. तिची शाळेत ओळख असून, तिच्या शिफारशीतून तिच्या मुलीला नक्कीच प्रवेश मिळेल, असे सांगून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.

logo
marathi.freepressjournal.in