मुंबई : बिल अपडेटच्या नावाने एका ४८ वर्षांच्या महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे पावणेपाच लाखांची फसवणूक केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी या ठगाचा शोध सुरू केला आहे.
तक्रारदार महिला ही विलेपार्ले येथे राहत असून, दोन दिवसांपूर्वी तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांच्या तिच्या घराचे इलेक्ट्रिक बिल भरले नाही तर विद्युत कनेक्शन बंद होईल, असे सांगितले. त्यामुळे त्याने सांगितल्याप्रमाणे एक ॲप डाऊनलोड करून त्यात तिच्यासह तिच्या बँक खात्याची माहिती दिली होती. यावेळी तिने शंभर रुपये ट्रान्स्फर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तिच्या बँक खात्यात सहा ऑनलाईन व्यवहार होऊन पावणेपाच लाख रुपये डेबिट झाले होते.