
मुंबई : कालका येथून डिलीव्हरीसाठी घेतलेले रेल्वे इंजिन डिलीव्हरी न करता एका व्यावसायिक कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी राधा रोडवेज कंपनीचे मालक पवन शर्मा यांच्याविरुद्ध वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. शर्माविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिलकुमार गुलाबचंद गुप्ता यांची कंपनी रेल्वे विभागाच्या अंतर्गत नोंदणीकृत वाहतूकदार म्हणून काम करते. त्यांच्या जे. बी. एन. डिलर्स असोशिएशन कंपनीला २७ एप्रिलला रेल्वे इंजिन लोड करबन मुंबईहून कालका आणि परत कालका येथून मुंबईतील परळ कारखान्यात सोडण्याचे कंत्राट मिळाले होते. या कामासाठी कंपनीने राधा रोडवेजशी करार करत दोन लाखांचे पेमेंट केले होते. मात्र रेल्वे इंजिनची डिलिव्हरी न झाल्याने त्यांनी वडाळा टीटी पोलिसांत तक्रार दाखल केली.