ब्रेस्ट कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठी विनामूल्य चाचणी

तपासणी करण्याकरिता सेवा प्रकल्प राबवण्यात आला होता
ब्रेस्ट कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठी विनामूल्य चाचणी

मुंबई : विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती आणि सेवा विभाग, नाना पालकर स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रीपाडा येथे नुकतेच महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी विनामूल्य चाचणी आणि तपासणी करण्याकरिता सेवा प्रकल्प राबवण्यात आला होता. सेवा प्रकल्पाचे उद्घाटन कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांच्या हस्ते झाले. मोहन सालेकर यांनी कॅन्सरच्या चाचणीची किती आवश्यकता आहे हे समजून सांगितले. त्यानंतर चाचणीला सुरुवात झाली. ३१ महिलांची पूर्ण दिवसात चाचणी झाली आणि प्रकल्पाची सांगता झाली. हा प्रकल्प गणेश श्रीवर्धन, संतोष झगडे, सिधांत सिंह, गणेश कडू, मिलिंद अणेराव, लोखंडे आणि राऊत यांच्या सहकार्याने आयोजित केला होता. या प्रकल्पाला प्रशांत परब, हेमंत घाडी, सुचित्रा परब, अशोक सत्रा, साधना पाठक, स्नेहा भगत, नम्रता पुंडे आदि उपस्थित होत़े. या प्रकल्पाला नाना पालकर समिति सदस्य किरण करळकर, विवेक छत्रे, आणि केतकर यांनी सदिच्छा भेट दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in