खासगी शाळांमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार

लहान मुलांचे चौथ्या लाटेपासून रक्षण करण्यासाठी १२ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर जोर दिला आहे
खासगी शाळांमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार
Published on

शाळा सुरू झाल्या असून, १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांची संख्या तीन लाख ९५ हजारांच्या घरात असून, या मुलांचे लसीकरण जलदगतीने व्हावे, यासाठी आता खासगी शाळांमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

कोरोनाची चौथी लाट उसळली असून लहान मुलांचे चौथ्या लाटेपासून रक्षण करण्यासाठी १२ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर जोर दिला आहे. मुंबईतील शाळा सुरू झाल्या असून, १ जुलैनंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पालिका शाळांत लसीकरण मोहीम राबवण्यात येत असली तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. पालक व शाळा व्यवस्थापन दोघांशी चर्चा सुरू असून, खासगी शाळांमध्ये कॅम्प लावण्यात येतील, अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in