लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल मारामारी

दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल मारामारी

मुंबई : मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच गर्दी अनियंत्रित झाल्यानं मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मंडपात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे दुर्भाग्यपूर्ण चित्र पाहायला मिळाले. मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले. अशातच दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप सध्या केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in