बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ५२ गुन्ह्यांची उकल

अटकेनंतर या सर्वांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते
 बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ५२ गुन्ह्यांची उकल

मुंबई : बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून मुद्रा लोन देण्याची बतावणी करून अनेकांची विशेषता महिलांची फसवणूक करणाऱ्या दहा जणांच्या एका टोळीला अंधेरी पोलिसांनी अटक केली. सुनील रेकू चव्हाण, भीमाशंकर लिंबाजी राठोड, सुजीत शिवप्रकाश पासी, चंद्रशेखर अमरप्पा राठोड ऊर्फ लमाणी, विलास रामचंद्र राठोड, रवी गोविंद पार, संतोष महादेव चव्हाण, सुरेश गुंडू राठोड ऊर्फ लमाणी, जयचंद्र वालू चव्हाण आणि विकास रामू चव्हाण अशी या दहाजणांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी २३ मोबाईल, पंधरा किपॅड असे ३८ मोबाईल, वेगवेगळ्या बँकांचे ६१ डेबीट कार्ड, विविध कंपनीचे ४८ सिमकार्ड, २१ लाख ६६ हजार ४८० रुपयांचे सोन्याचे दागिने, दहा लाखांची कॅश, एक चारचाकी महागडी कार, एक लॅपटॉप, सहा वह्या आणि सहा रजिस्ट्रार, असा ५८ लाख १६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या सर्वांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीच्या अटकेने मुंबईसह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ५२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही टोळी सोशल मीडियावर बोगस जाहिरात देऊन अनेकांना विशेषत: महिलांना मुद्रा लोन देण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करत होती. याच गुन्ह्यांत सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in