राणी बागेत फळ-भाज्यांचे प्रदर्शन; २ ते ४ फेब्रुवारी सर्वांसाठी विनामूल्य खुले

गेल्या आठ वर्षापासून दरवर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.
राणी बागेत फळ-भाज्यांचे प्रदर्शन; २ ते ४ फेब्रुवारी सर्वांसाठी विनामूल्य खुले

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात फळे, भाज्या, विविध प्रजातींची झाडे, फुले यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात झाडे, फळे, भाज्या, फुले यांचे महत्त्व प्रत्येकाला समजावे, पर्यावरण विषयी आवड निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. यंदाच्या प्रदर्शनात ‘ॲॅनिमल किंग्डम' हे पर्यावरणप्रेमींचे आकर्षण ठरणार आहे. दरम्यान, २ ते ४ फेब्रुवारी हे प्रदर्शन आयोजित केले असून सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल, असेही ते म्हणाले.

पालिकेच्या उद्यान विभागामार्फत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. नागरिकांना पर्यावरणाविषयी आवड निर्माण होण्यासाठी फळे, फुले, भाज्या इत्यादींचे ज्ञान मिळावे, त्याचे महत्त्व समजावे यासाठी पालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १९९६ पासून आजपर्यत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात दरवर्षी झाडे, फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन केले जाते.

गेल्या आठ वर्षापासून दरवर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. त्यामुळे महोत्सवाची /प्रदर्शनाची वाट मुंबईतील प्रत्येक नागरिक आतुरतेने पाहत असतो. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील कलाकार, विदेशी पर्यटकही दरवर्षी आवर्जून भेट देतात. या वर्षीही काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने “ॲॅनिमल किंग्डम’ हा विषय केला आहे. पालिकेच्या २४ विभागातील उद्यान विभागाच्या नर्सरी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शोभेच्या फुलांच्या,फळांच्या तसेच भाज्यांच्या झाडांची निर्मिती या निमित्त करण्यात आली आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मुंबईतील जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच शाळेतील विद्यार्थ्याने या ठिकाणी भेट द्यावी त्यासाठीचे प्रत्येक शाळा प्रशासनाने नियोजन करावे, असे आवाहन जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in