

मुंबई : अन्न व्यवसाय करणाऱ्या लघु व मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) यापुढे एफसीसीएआय परवान्याचे नूतनीकरण करावे लागणार नाही. हे परवाने आता आजीवन वैध राहतील. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (एफसीसीएआय) सल्लागार डॉ. अलका राव यांनी मुंबईत झालेल्या सीएएसएमबीच्या 'प्रेरणा' महिला सक्षमीकरण शिखर परिषद व ६ व्या स्थापना दिन सोहळ्यात ही ऐतिहासिक घोषणा केली.
देशातील लघु व मध्यम उद्योजकांसाठी (एमएसएमई) एक ऐतिहासिक दिलासा देणारी घोषणा करताना भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (एफसीसीएआय) च्या सल्लागार डॉ. अलका राव यांनी जाहीर केले की, एफसीसीएआयचे परवाने व नोंदणी आता आजीवन वैध राहतील. म्हणजेच वारंवार नूतनीकरणाच्या जाचातून उद्योजकांची कायमची सुटका होणार आहे.
एमएसएमईवरील अनुपालन भार
कमी करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या व्यापक नियामक सुधारणांचा हा भाग असून उलाढाल मयदित बदल, दुहेरी अनुपालन रद्द आणि जोखीम- आधारित तपासणी पद्धतीचा यात समावेश आहे. एफसीसीएआयने एमएसएमईवरील अनुपालन भार कमी करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण नियामक सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे परवाने व नोंदणी आता आजीवन वैध राहणार असून व्यावसायिकांची
वारंवार नूतनीकरणाची दीर्घकालीन समस्या कायमची संपुष्टात आली आहे. अलका राव यांनी भाषणामध्ये अन्नप्रक्रिया उद्योगात ती धोरणाबाबत स्पष्ट सखोल आणि दूरदृष्टी असलेले विवेचन केले. उपस्थित नव्या नियमांबाबत आश्वस्त व उत्साहित होऊन लघु-मध्यम उद्योजक घरी परतले.