‘त्या’ प्रकल्पामुळे मुंबईवर भविष्यात परिणाम; भाजपकडून चुकीची माहिती दिल्याचा ॲॅड. सागर देवरे यांचा दावा

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुलुंड येथे प्रकल्पबाधितांसाठी वसाहत आणि मुलुंड, भांडुप व विक्रोळीतील मिठागराच्या जागेवर धारावीकरांचे पुनर्वसन हे भविष्यात मुंबईवर परिणाम करणारे आहेत, अशी माहिती भाजपकडून दिली जात आहे.
‘त्या’ प्रकल्पामुळे मुंबईवर भविष्यात परिणाम; भाजपकडून चुकीची माहिती दिल्याचा ॲॅड. सागर देवरे यांचा दावा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुलुंड येथे प्रकल्पबाधितांसाठी वसाहत आणि मुलुंड, भांडुप व विक्रोळीतील मिठागराच्या जागेवर धारावीकरांचे पुनर्वसन हे भविष्यात मुंबईवर परिणाम करणारे आहेत, अशी माहिती भाजपकडून दिली जात आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ही चुकीची माहिती दिली जात असल्याचा दावा ॲॅड. सागर देवरे यांनी शनिवारी मुलुंडमधील एका पत्रकार परिषदेत केला.

धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंड डम्पिंग ग्राउंडची ४२.६ एकर जमीन पालिकेने दिलेलीच नाही, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना दिली. मुलुंड येथील जकात नाक्याची १८ एकर आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडची ४६ एकर जमीन पालिकेच्या मालकीची असून राज्य सरकारने १० जानेवारी २०२४ मध्ये ही जागा पालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे मागितली आहे. त्यानंतर १८ एकर जमीन सरकारला देण्याची प्रक्रिया असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले आहे. मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जागा सहा वर्षांसाठी खासगी कंपनीला दिली असून २०२५ मध्ये त्या जागेची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणची जमीन पुनर्वसन प्रकल्पासाठी सद्यस्थितीत दिली नसली तरी धारावी प्रकल्पात बाधितांसाठी देण्यात येणार नाही, असे पालिका व सोमय्या यांनी स्पष्ट केलेले नाही, यावर देवरे यांनी प्रकाश टाकला.

logo
marathi.freepressjournal.in