मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा

राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्री यांनी यावेळी गणरायाला घातले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची  प्राणप्रतिष्ठा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी बुधवारी सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा आरती करण्यात आली. यावेळी मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्री यांनी यावेळी गणरायाला घातले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपताना निर्भय मुक्त वातावरण आनंद जल्लोषात तसेच पर्यावरण पूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in