मध्य रेल्वेकडून गांधी जयंती साजरी; स्वच्छता पंधरवड्याची विविध उपक्रमांद्वारे सांगता

२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि समारोपानिमित्त सीएसएमटी स्थानकावर विविध उपक्रम राबवण्यात आले
मध्य रेल्वेकडून गांधी जयंती साजरी; स्वच्छता पंधरवड्याची विविध उपक्रमांद्वारे सांगता
Published on

भारतीय रेल्वेमध्ये १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. रेल्वे स्थानके, गाड्या, कार्यालये, वसाहती, खाद्यपदार्थांचे स्टॉल इ. परिसरात स्वच्छता, जनजागृती मोहीम यावेळी प्रशासनाकडून राबवण्यात आली.

२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि समारोपानिमित्त सीएसएमटी स्थानकावर विविध उपक्रम राबवण्यात आले. महात्माजींचे चित्र, स्वच्छता संदेश आणि आझादी का अमृत महोत्सवाची थीम असलेले डिझेल लोकोमोटिव्ह आणि एक एमू रेक रेल्वे कर्मचाऱ्यांनी रंगवले होते. तसेच सीएसएमटी येथे स्वच्छता व पुनर्वापर या विषयावर स्किट व स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधींच्या स्वच्छतेच्या संदेशाचे महत्त्व सांगणारी भव्य रांगोळीही सीएसएमटीच्या आवारात लावण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे गांधीजींवरील सचित्र प्रदर्शनही लावण्यात आले होते. या पंधरवड्यात मध्य रेल्वेने विविध उपक्रम राबवले.

logo
marathi.freepressjournal.in