गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी तयारी करण्यात आली आहे.
गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था
Published on

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा विविध उपक्रम राबविणारी मुंबई महानगरपालिका आता मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला होणाऱ्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था केली आहे.

श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार अधिकारी-कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. श्रीगणेशोत्सव अंतर्गत स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी) येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत भाविकांसाठी विविध नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. महानगरपालिका आयुक्त गगराणी, अतिरिक्त आयुक्त सैनी यांनी स्वराज्यभूमीला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.

logo
marathi.freepressjournal.in