गणेशभक्तांना समुद्रकिनाऱ्यावर ब्लू बॉटल आणि स्टिंग रेचा दंश

विसर्जनाच्या दिवशी १५ ते २० जणांना या दोन्ही समुद्रीजीवांचा दंश होण्याच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे
गणेशभक्तांना समुद्रकिनाऱ्यावर ब्लू बॉटल आणि स्टिंग रेचा दंश

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या ब्लू बॉटल आणि स्टिंग रेचा धोका लक्षात घेऊन गणेश विसर्जनापूर्वीच पालिकेने धोक्याच्या सूचना जारी केल्या होत्या; मात्र याकडे दुर्लक्ष करून गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर समुद्रातदेखील जाऊन मजा घेतली. त्यामुळे गेल्या चारही विसर्जनाच्या दिवशी १५ ते २० जणांना या दोन्ही समुद्रीजीवांचा दंश होण्याच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे.

महिन्या-दीड महिन्यापासून गिरगाव, जुहू, वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर ब्लू बॉटल दिसून येत असून ते नागरिकांना दंश करू लागल्याने प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलण्यात आली. पालिकेकडून यासाठी जनजागृतीदेखील सुरू करण्यात आली. यात समुद्रकिनाऱ्यावर कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान, कोस्टल कन्झर्व्हेशन फाउंडेशन, महापालिकेकडून ब्लू बॉटलपासून खबरदारीची आणि उपाययोजनेची फलके लावली. तसेच जीवरक्षकदेखील सतर्क राहू लागले, तर आता ब्लू बॉटलसह पाकटच्या काट्याचा दंश होण्याच्या घटना गिरगाव चौपाटीवर झाल्याची माहिती जीवरक्षकांकडून देण्यात आली.

पालिकेची खबरदारीची पावले

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनापासून दहा दिवसांच्या गणपती विसर्जनापर्यंत बहुतांश समुद्रकिनाऱ्यावर ब्लू बॉटल आणि स्टिंग रे दंश झाला आहे. ब्लू बॉटलच्या विषारी शुंडकांचा आणि पाकटच्या काट्याचा गणेशभक्तांना दंश झाला. त्यामुळे महापालिकेने खबरदारीची पावले उचलून बॅरिकेट्स उभारले. त्यामुळे दीड ते सात दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या तुलनेत दंश होण्याच्या घटना काही प्रमाणात कमी झाल्या, असे एका जीवरक्षकाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in