गणेशोत्सव विशेष गाड्यांचे आरक्षण फुल; आरक्षण सुरू होताच आठ ते दहा मिनिटांत साडेसातशे वेटिंग

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने सात रेल्वे गाड्यांच्या २०२ फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
गणेशोत्सव विशेष गाड्यांचे आरक्षण फुल; आरक्षण सुरू होताच आठ ते दहा मिनिटांत साडेसातशे वेटिंग
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने सात रेल्वे गाड्यांच्या २०२ फेऱ्या जाहीर केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण रविवारी सकाळी सुरू होताच सुरुवातीच्या आठ ते दहा मिनिटांत सर्वच्या सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल झाले. त्याचप्रमाणे आरक्षण साडेसातशेहून अधिक वेटिंगवर गेले.

मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्यातील २०२ रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले. या गाड्यांचे आरक्षण रविवारी सुरू झाले. गाड्यांचे आरक्षण सुरू होताच सात रेल्वे गाड्यांचे बुकिंग हाऊसफुल झाले. या गाड्यांचे आरक्षण करताना दलाल मध्यस्थी करत असल्याने मूळ प्रवाशांना रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नाही, असा दावा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.

आरक्षित झालेल्या गाड्या आणि ज्या प्रवाशांनी आरक्षण केले आहे, त्यांची यादी रेल्वे प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी केली आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाला प्रवासी संघटनांकडून एक निवेदन देण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in