एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी पाच जणांच्या टोळीस अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली
एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी पाच जणांच्या टोळीस अटक

मुंबई : एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी पाच जणांच्या एका टोळीला वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी ३० लाख रुपयांचा दीडशे ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी वांद्रे युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना पाच संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दीडशे ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा सापडला. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्यांना या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in