Mumbai Shocker : धक्कादायक! मुंबईत महिलेवर हल्ला आणि सामूहिक अत्याचार

मुंबईतील कुर्ला परिसरात ४२ वर्षीय महिलेवर हल्ला करून केला सामूहिक बलात्कार. नराधमांनी पीडितेवर केला निर्घृण अत्याचार
Mumbai Shocker : धक्कादायक! मुंबईत महिलेवर हल्ला आणि सामूहिक अत्याचार
Published on

मुंबई पुन्हा एकदा एका सामूहिक बलात्काराने हादरली. कुर्ला परिसरातील एका ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नराधमांनी पीडित महिलेला घरात घुसून तिच्या हल्ला केला. त्यांनतर तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. एवढंच नव्हे तर महिलेच्या गुप्तांगाला सिगरेटचे चटके दिले असल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तीनही आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पूर्व परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय पीडित महिलेच्या घरामध्ये ३ नराधम शस्त्रासह जबरदस्ती घुसले. पीडितेवर आधी तिच्या दोनही हातांवर शस्त्रांनी वार केले. त्यानंतर तिघांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. मात्र, ते नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पीडितेच्या गुप्तांगाला सिगरेटचे चटके दिले. त्यांनी अत्याचार करत असतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हे तीनही नराधम कुर्ला परिसरातच राहणारे असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तीनही आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in