गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरेशी सह आठ जणांवर गुन्हा दाखल

सलीम फ्रूट याने अवघ्या २१ लाख रुपयांत इमारतीतील निम्मे फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप या याचिकेत लावण्यात आला आहे.
गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरेशी सह आठ जणांवर गुन्हा दाखल

गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याच्यावर अन्य आठ जणांवर दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद रफीक तांबे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफीक यांची दक्षिण मुंबईतील नळबाजार परिसरात इमारत असून, सलीम फ्रूट याने अवघ्या २१ लाख रुपयांत इमारतीतील निम्मे फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप या याचिकेत लावण्यात आला आहे.

गृहनोंदणीसाठी कमी रक्कम अथवा कर भरावा लागू नये, यासाठी सलीम फ्रूट याने मालमत्तेच्या मूळ किमतीपेक्षा फारच कमी किमतीत हे फ्लॅट विकत घेतले होते. सलीम फ्रूट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सरकारची फसवणूक करत खोटी बनावट कागदपत्रे दाखवून करापोटी सरकारचे नुकसान केले आहे, असा आरोप तांबे यांनी केला आहे.

दादर पोलिसांनी तांबे यांच्या तक्रारीवरून या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहिली असता, ही कागदपत्रे चोरीला गेल्याचे आढळले. त्यामुळे फसवणूक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता सलीम फ्रूट आणि अन्य आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सलीम फ्रूट सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात असून दाऊद इब्राहिमसाठी खंडणीचे रॅकेट चालवणे, तसेच ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि अन्य दहशतवादी टोळ्यांशी संपर्कात असल्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in