Mumbai : 'गर्जना मोर्चा'त ५ हजारांहून जास्त जेन झींचा सहभाग; तरुण पिढी, महिलांचाही समावेश

मुंबईत रविवारी (दि.०४) आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’मध्ये जवळपास ५ हजारांहून जास्त जेन झी सहभागी झाले होते. या मोर्च्यात मुंबईच्या विविध भागांतून तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून नागरिक आले होते.
Mumbai : 'गर्जना मोर्चा'त ५ हजारांहून जास्त जेन झींचा सहभाग; तरुण पिढी, महिलांचाही समावेश
Mumbai : 'गर्जना मोर्चा'त ५ हजारांहून जास्त जेन झींचा सहभाग; तरुण पिढी, महिलांचाही समावेशX|@ShivSenaUBT_
Published on: 

पूनम अपराज/मुंबई

मुंबईत रविवारी (दि.०४) आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’मध्ये जवळपास ५ हजारांहून जास्त जेन झी सहभागी झाले होते. या मोर्च्यात मुंबईच्या विविध भागांतून तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून नागरिक आले होते. विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठाकरे बंधूंच्या पाठीशी असल्याचे दर्शवत होता.

सायनमधील मनीष मंडल या सहभागीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा मुखवटा घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘फ्री प्रेस जर्नल’शी बोलताना मंडल म्हणाला, ‘जनतेचे मताधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवले पाहिजे.’ या मोर्च्यात महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. चारकोपमधील सायली बेळोस यांनी आंदोलनात सहभागी होणे पसंत केले. त्या पतीसह सकाळी ९ वाजल्यापासून उपस्थित होत्या.

पाठिंब्यासाठी आलो

सायली बेळोस म्हणाल्या, “आज रविवार आहे आणि आम्ही सहसा हा दिवस कुटुंबासोबत घालवतो. मात्र, केवळ ठाकरे बंधूंना पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझे पती सकाळपासून येथे आलो आहोत.

कट्टर कार्यकर्तेही रस्त्यावर

या रॅलीत ठाकरे कुटुंबाचे जुने समर्थकही सहभागी झाले होते. बाळसाहेब ठाकरेंचे परळ येथील कट्टर कार्यकर्ते येथील दत्ता सतोसे या मोर्च्यात सामील झाले होते. सतोसे म्हणाले, 'महाराष्ट्रात ठाकरेंच्या रॅलींना अशी प्रचंड गर्दी जमते, मग ते मते कुणाकडे जातात? कथित मतांची चोरी रोखण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत आहोत.'

आयोजकांवर ‘एफआयआर’ दाखल

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या 'विशाल गर्जना मोर्चा'च्या आयोजकांनी पोलिसांची परवानगी न घेताच मोर्चा काढल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काढण्यात आलेल्या या मोर्चाबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ (लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन), कलम १८९ (बेकायदेशीर जमाव) आणि कलम १९० (सामान्य उद्देशाच्या पूर्ततेसाठी केलेल्या गुन्ह्याबद्दल बेकायदेशीर जमावाच्या सदस्यांची जबाबदारी) अंतर्गत हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या मोर्चासाठी आयोजकांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती, त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदवला. या मोर्चानर परवानगीचा भंग आणि इतर अटींच्या उल्लंघनासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोल्ह्याची कोल्हेकुई - शेलारांची ठाकरेंवर टीका

राज्यमंत्री आशीष शेलारांनी विरोधी पक्षांवर निवडणुकीतील पराभवानंतरच निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून दुतोंडी अवलंबल्याचा आरोप केला. ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर उपरोधिक टीका करताना त्यांनी हा खराखुरा विरोध नसून 'कोल्ह्याची कोल्हेकुई' असल्याचे म्हटले.

राज्यमंत्री आशीष शेलार यांनी रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर झालेल्या सहा निवडणुकांचा संदर्भ देत आशीष शेलार म्हणाले की, काही राज्यांमध्ये भाजपप्रणीत युतीचा विजय झाला, तर केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये बिगर-भाजप पक्षांनी सरकार स्थापन केले. यावरून निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘प्रसिद्धीचा स्टंट’

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही या मोर्चाला 'प्रसिद्धीचा स्टंट' म्हणत फेटाळून लावला तसेच या मोर्चाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरे बंधूंना निवडणूक सुधारणांपेक्षा प्रसिद्धीमध्येच अधिक रस असल्याचा आरोप त्यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in