Mumbai : चेंबूरमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

चेंबूर पूर्व येथील मुकुंद नगर परिसरातील एका वेल्डिंग गॅरेजमध्ये रिकाम्या गॅस टँकरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना ६.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात टँकरचालकाचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले.
Mumbai : चेंबूरमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Mumbai : चेंबूरमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमीX | IANS
Published on

मुंबई : चेंबूर पूर्व येथील मुकुंद नगर परिसरातील एका वेल्डिंग गॅरेजमध्ये रिकाम्या गॅस टँकरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना ६.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात टँकरचालकाचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले. 

मुकुंद नगर येथील गॅरेजमध्ये रिकाम्या गॅस टँकरवर वेल्डिंगचे काम सुरू असतानाच अचानक जोरदार स्फोट झाला. ब्लास्ट झाल्याने आसपासच्या इमारतीच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या. स्फोटाची तीव्रता इतकी होती की परिसरात काही काळ घबराट पसरली.

या दुर्घटनेत टँकरचालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच वेल्डिंगचे काम करणारे मोहम्मद अकरम (१९), मोहम्मद फय्याज (४८) हे दोघेजण गंभीर जखमी झाले सुरू केले. असून त्यांना तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका (सायन) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in