गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : अनंत गर्जे यांना जामीन मंजूर

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात दंतवैद्यक म्हणून कार्यरत असलेल्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा पती तसेच भाजपच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला.
गौरी पालवे आत्महत्या प्रकरण :  अनंत गर्जे यांना जामीन मंजूर
गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : अनंत गर्जे यांना जामीन मंजूर
Published on

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयात दंतवैद्यक म्हणून कार्यरत असलेल्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा पती तसेच भाजपच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला. अतिरिक्त न्यायाधीश रुपाली पवार यांनी दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर निर्णय राखून ठेवलेला निर्णय जाहीर करताना अनंत गर्जे यांना जामीन मंजूर केला.

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात दंतवैद्यक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. गौरी पालवे (२८) हिने गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली. गौरी आणि अनंत गर्जे यांचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झाले होते. गौरीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गर्जे, त्याचा भाऊ आणि बहीण यांच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

logo
marathi.freepressjournal.in