सिल्व्हर ओकवर गौतम अदाणींनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी समूहाच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे म्हटले होते, आता या भेटींमुळे चर्चांना उधाण
सिल्व्हर ओकवर गौतम अदाणींनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यामध्ये तब्बल २ तास चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली असून देशाच्या राजकारणात या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या दोघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अदाणींच्या बाजूने भूमिका मांडल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या समूहाच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे म्हटले होते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात विरोधी पक्ष एकजूट होत असताना शरद पवारांची उद्योगपती गौतम अदाणींसोबत तब्बल २ तास चर्चा झाल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in