बालवाड्यांचे होणार जिओ मॅपिंग; पालिका शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई महापालिकेच्या शाळांत दर्जेदार शिक्षण देण्यासह अनेक उपक्रम राबवण्यात येतात
बालवाड्यांचे होणार जिओ मॅपिंग; पालिका शिक्षण विभागाचा निर्णय

पालिका शाळांचे सक्षमीकरण करण्याबरोबरच आता बालवाड्यांचे जिओ मॅपिंग करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. जिओ मॅपिंगमध्ये ज्या भागात बालवाड्यांची संख्या कमी तेथे संख्यावाढीवर भर देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांत दर्जेदार शिक्षण देण्यासह अनेक उपक्रम राबवण्यात येतात; मात्र या शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या बालवाड्यांची संख्या कमी असल्यामुळे खासगी बालवाड्यांकडे पालक वळतात. पालिकेने काही वर्षांपूर्वी बालवाड्यांची संख्या वाढवली होती; मात्र या बालवाड्यांमध्ये अनेक गोष्टींच्या कमतरता होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाने आता बालवाड्यांचे सक्षमीकरण करण्याचे ठरवले आहे.

पालिकेने पाच वर्षांपूर्वी एकाच वेळी ३९६ नवीन बालवाड्या सुरू केल्या; मात्र कोणत्या विभागात बालवाड्यांची संख्या कमी आहे, कुठे जास्त आहे, याचा आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाने बालवाड्यांचेही जीआयएस मॅपिंग करण्याचे ठरवल्याचे शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in