मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, शरद पवारांचे संकेत

बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते
 मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, शरद पवारांचे संकेत
Published on

शरद पवार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून हे सरकार सहा महिनेच टिकणार असल्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असे संकेत दिले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी यशवंतरात चव्हाण सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.

पवार म्हणाले की, “महाराष्ट्रातील नवे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा. विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे.” दरम्यान, विरोधी पक्षनेते पदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे

logo
marathi.freepressjournal.in