IMD Rain Update: उकाड्यापासून दिलासा मिळणार! पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार; ठाणे-रायगडमध्येही पाऊस बरसणार

Mumbai Rains: सध्याचे हवामान पाहता मुंबईत येत्या शनिवारी ८० ते ९० मिमी पावसाची शक्यता आहे.
IMD Rain Update: उकाड्यापासून दिलासा मिळणार! पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार; ठाणे-रायगडमध्येही पाऊस बरसणार
Published on

मुंबई : सतत हुलकावणी देणारा पाऊस येत्या शनिवारी ते सोमवारदरम्यान मुंबई, ठाणे व रायगडमध्ये कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने मुंबईला पावसाचा ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे आणि घामाच्या धारांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना त्यामुळे दिलासा मिळेल.

सध्याचे हवामान पाहता मुंबईत येत्या शनिवारी ८० ते ९० मिमी पावसाची शक्यता आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो गोवा व उत्तर कोकणाच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे मुंबईत पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा होती. मात्र अधून मधून पडणाऱ्या हलक्या सरींवर मुंबईकरांना समाधान मानावे लागत आहे. हवामान खात्याने मुंबईत ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसासंदर्भात व्यक्त केलेले अंदाज फोल ठरले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in