घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण; आरोपींविरुद्ध आरोपपत्र सादर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध शुक्रवारी आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण; आरोपींविरुद्ध आरोपपत्र सादर
Published on

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध शुक्रवारी आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यात भावेश प्रभूदास भिडे, मनोज रामकृष्ण संगू, सागर कुंडलिक कुंभारे, जान्हवी नयन मराठे ऊर्फ जान्हवी केतन सोनलकर यांचा समावेश आहे. ३२९९ पानांच्या या आरोपपत्रात १०२ साक्षीदारांची जबानी नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, गरज पडल्यास पुरवणी आरोपपत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मे महिन्यांत घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सतराजणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती येताच पोलिसांनी कंपनीचा इगो कंपनीचा मुख्य संचालक भावेश भिंडे याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत इतर आरोपींची नावे समोर आले होते. त्यानंतर होर्डिंगला फिटनेस प्रमाणपत्र देणार्‍या मनोज संधूला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर जून महिन्यांत कंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठे आणि कॉन्ट्रॅक्टर सागर कुंभारे यांना गोव्यातील एका हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनीही विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केा होता. मात्र अटकपूर्व जामिन अर्ज फेटाल्यानंतर जान्हवी आणि सागर हे दोघेही पळून गेले होते. सध्या चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याने विशेष पथकाने ५७ व्या दिवशीच चारही आरोपींविरुद्ध ३२९९ पानांचे आरोपपत्र शुक्रवारी स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in