घाटकोपर जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून नियमित पाणीपुरवठा सुरू

घाटकोपर (पश्चिम) येथील निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेच्या जल अभियंता खात्याकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे १० एप्रिलपासून या दोन्ही कप्प्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दुरुस्ती दरम्यानच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या.
घाटकोपर जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून नियमित पाणीपुरवठा सुरू
घाटकोपर जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून नियमित पाणीपुरवठा सुरू
Published on

मुंबई : घाटकोपर (पश्चिम) येथील निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेच्या जल अभियंता खात्याकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे १० एप्रिलपासून या दोन्ही कप्प्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दुरुस्ती दरम्यानच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. दरम्यान, दुरुस्तीपूर्वी असलेल्या वेळाप्रमाणेच १० एप्रिलपासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पुढील ५ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे. तसेच, काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. पाणीपुरवठा क्षेत्र नारायणनगर आणि झोन क्रमांक एनएक्स ०३ शी संबंधित चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट मार्ग, एनएसएस मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एस. मार्ग, खालाई गाव, किरोळ गाव, विद्याविहार (पश्चिम), हंसोटी गल्ली, खोत गल्ली, महात्मा गांधी मार्ग, नवरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, ध्रुवराजसिंह गल्ली, गोपाळ गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी या परिसरामध्ये दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० वाजता आणि रात्री १०.४५ ते ११.३० वाजता होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५ वाजेदरम्यान राहील. 

पाणीपुरवठा क्षेत्र पंतनगर आऊटलेट आणि झोन क्रमांक एनएक्स ०६ शी संबंधित भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राईम ब्रांच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सी. जी. एस. वसाहत, गंगावाडी, ध्रुवराजसिंह गल्ली, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम. टी. एन. एल.) गल्लीत, ए. जी. एल. आर. मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्गालगत घाटकोपर (पश्चिम) ते श्रेयस सिग्नलपर्यंतचा परिसर आदी भागात दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.१५ ते रात्री १०.३० वाजता होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.४५ ते रात्री ११.०० वाजेदरम्यान राहील. 

पाणीपुरवठा क्षेत्र सर्वोदय बुस्टींग आणि झोन क्रमांक एनएक्स ०६ शी संबंधित सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्गालगत घाटकोपर (पश्चिम), गांधीनगर या परिसरात दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ वाजेदरम्यान होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ वाजेदरम्यान राहील, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. 

logo
marathi.freepressjournal.in