मुंबई : तरुणीला अटक, हॉटेल व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत मागितली १५ कोटींची खंडणी

जानेवारी महिन्यांत तिने त्यांना चहाच्या बहाण्याने गुंगीचे औषध दिले होते. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून...
मुंबई : तरुणीला अटक, हॉटेल व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत मागितली १५ कोटींची खंडणी
Published on

मुंबई : अंधेरीतील एका हॉटेल व्यावसायिकाकडे १५ कोटींची खंडणी मागणी केल्याप्रकरणी निकिता शाम दाधीच ऊर्फ किमया कपूर या तरुणीला आंबोली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असून, तिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

यातील तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून, त्यांच्याकडे निकिता ही पर्सनल सेक्रेटरीच्या नोकरीसाठी आली होती. याच दरम्यान तिने त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. जवळीक निर्माण करून तिने विविध कारण सांगून त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले होते.

जानेवारी महिन्यांत तिने त्यांना चहाच्या बहाण्याने गुंगीचे औषध दिले होते. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. त्यांनी १५ कोटी रुपये दिले, नाही तर त्यांची सोशल मिडीयासह कुटुंबीय, नातेवाईकांकडे व्हिडीओ पाठवून बदनामीची धमकी दिली होती. त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करून त्यांना या गुन्ह्यांत अटक करू अशीही धमकी दिली होती. तिच्याकडून होणाऱ्या सततच्या ब्लॅकमेलिंगसह खंडणीच्या धमकीनंतर त्यांनी आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रार अर्जाची पोलिसाकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात निकिती ही त्यांना खंडणीसाठी ब्लॅकमेल करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी निकिताविरुद्ध गुन्हा नोंदवून तिला याच गुन्ह्यांत सोमवारी अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in