मद्यप्राशन करताना झालेल्या वादातून मैत्रिणीची हत्या

मद्यप्राशन करताना झालेल्या वादातून शिवीागाळ केली म्हणून सपना सतीश बातम या ४० वर्षांच्या मैत्रिणीची दगडाने ठेचून हत्या करून हत्येचा पुरावा नष्ट करून पळून गेलेल्या आरोपीला कुठलाही पुरावा नसताना शिवडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.
मद्यप्राशन करताना झालेल्या वादातून मैत्रिणीची हत्या

मुंबई : मद्यप्राशन करताना झालेल्या वादातून शिवीागाळ केली म्हणून सपना सतीश बातम या ४० वर्षांच्या मैत्रिणीची दगडाने ठेचून हत्या करून हत्येचा पुरावा नष्ट करून पळून गेलेल्या आरोपीला कुठलाही पुरावा नसताना शिवडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. शहजादा ऊर्फ रमजान शफी शेख असे या आरोपीचे नाव असून, याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे एपीआय स्नेहलसिंग खुळे यांनी सांगितले.

२२ जानेवारीला शिवडीतील टिकटॉक पॉइंट, बीपीसीएल कंपनीच्या मागील बाजूस शिवडी पोलिसांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या स्थितीत होता, त्यामुळे या महिलेची ओळख पटली नव्हती. शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. हत्येनंतर मारेकऱ्याने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत शिवडी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत यांच्या पथकातील सागर काळेकर, विशाल चंदनशिवे, शिवाजी पासलकर, सचिन माने, सागर काळेकर, स्नेहलसिंग खुळे, विश्राम मदने, शिव धुमाळ यांच्यासह पोलीस अंमलदाराचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाने महिलेची ओळख पटावी म्हणून विविध परिसरात एक हजाराहून अधिक फोटो लावले होते. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जास्तीत जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला होता. या माहितीनंतर ही महिला मुंबई सेंट्रल येथे वेश्या व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिचा फोटो तिच्या मुलीला दाखविला असता, तिने तिचे नाव सपना बातम असल्याचे असल्याचे सांगितले. १४ जानेवारीला सपना ही रमजानसोबत बाहेर गेली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी पोलिसांनी रमजानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in