'बॉम्बे' रक्तगटदात्यांची माहिती द्या! राज्यभरातील रक्तपेढ्यांना रक्त संक्रमण परिषदेचे आदेश

मुंबईत थिंक फाऊंडेशन नावाची संस्था आहे, ती हा दुर्मीळ रक्तगट असलेल्या रक्तदात्यांची यादी तयार करून ठेवते.
'बॉम्बे' रक्तगटदात्यांची माहिती द्या! राज्यभरातील रक्तपेढ्यांना रक्त संक्रमण परिषदेचे आदेश

मुंबई : साधारणतः ए, बी, एबी, ओ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे रक्त सर्वांच्या परिचयाचे आहेत; मात्र, याव्यतिरिक्त आणखी एक रक्तगट आहे तो म्हणजे 'बॉम्बे'. अत्यंत दुर्मीळ असा हा रक्तगट असल्याने हा रक्तगट असलेल्यांची माहिती देण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) राज्यभरातील सर्व रक्तपेढ्यांना दिले आहेत.

बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तींना अनेकदा रक्त मिळत नाही. त्यांच्या नातेवाईकांना बरीच धावपळ करावी लागते. मुंबईत थिंक फाऊंडेशन नावाची संस्था आहे, ती हा दुर्मीळ रक्तगट असलेल्या रक्तदात्यांची यादी तयार करून ठेवते. या रक्तगटाची गरज भासल्यास बहुतांश वेळा या संस्थेला आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे संपर्क केला जातो; मात्र, काही महिन्यांत अशा पद्धतीने हा रक्तगट असणाऱ्या दात्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना त्यांच्याकडे, जर अशा रक्तगटाच्या व्यक्तीची माहिती असेल, तर त्यांनी विहित नमुन्यात भरून २९ फेब्रुवारीपर्यंत परिषदेला पाठविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात एकूण ३६३ रक्त्तपेढ्या असून, त्यापैकी ७६ रक्तपेढ्या शासकीय असून, २८७ रक्तपेढ्या धर्मादाय आणि खासगी आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in