ओपन स्पेस धोरण निश्चिती हरकती सूचना एक महिन्यांची मुदतवाढ द्या; भाजपची मागणी

महानगरपालिकेने सप्टेंबरमध्ये मैदाने आणि उद्यानांचा अवलंब करण्याबाबतचा मसुदा धोरण प्रकाशित करून १० ऑक्टोबर पर्यंत नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविल्या होत्या.
ओपन स्पेस धोरण निश्चिती हरकती सूचना एक महिन्यांची मुदतवाढ द्या; भाजपची मागणी

मुंबई : ओपन स्पेस व उद्याने भाडेतत्त्वावर देण्यास मुंबईकरांनी विरोध केला आहे. त्यामुळे थेट निर्णय न घेता मुंबईकरांची मते जाणून घेण्यासाठी हरकती सूचना सादर करायला मुदतवाढ द्या, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिकेला पत्र लिहून केली आहे.

ओपन स्पेस पाॅलिसीवर मुंबईकरांच्या १०० हुन अधिक हरकती सूचना पाठवल्या आहेत. हरकती सूचना फारच कमी आल्या आहेत. सणासुदीच्या काळात मुंबईकर गावी मुंबई बाहेर जातात. त्यामुळे यावर निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे हरकती सदर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत पुनरुच्चार केला. हरकती सूचना मुंबई महापालिकेने जाहीर केल्या पाहिजे. तसेच हरकती सूचना नेमक्या काय आल्या ते मुंबईकरांना कळलं पाहिजे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

महानगरपालिकेने सप्टेंबरमध्ये मैदाने आणि उद्यानांचा अवलंब करण्याबाबतचा मसुदा धोरण प्रकाशित करून १० ऑक्टोबर पर्यंत नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in