मेट्रो, मोनोरेलमध्ये स्वतंत्र जागा द्या, मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी

मुंबईकरांची लाइफलाईन असलेल्या लोकलप्रमाणे मेट्रो आणि मोनोरेलमध्येही स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी मुंबईचा डबेवाला असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मेट्रो, मोनोरेलमध्ये स्वतंत्र जागा द्या, मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी
संग्रहित फोटो
Published on

रुचा कानोलकर/मुंबई

मुंबईकरांची लाइफलाईन असलेल्या लोकलप्रमाणे मेट्रो आणि मोनोरेलमध्येही स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी मुंबईचा डबेवाला असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील वाहतुकीच्या सुविधांमध्ये आमूलाग्र बदल होत असताना, शहराच्या विविध भागात जेवणाचे डबे पोहचवणाऱ्या डबेवाल्यांना मात्र मेट्रो आणि मोनोरेलमध्ये अडचण येत आहे. त्यामुळे या डबेवाल्यांच्या सोयीसाठी मेट्रो आणि मोनोरेल गाड्यांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले की, मेट्रो आणि मोनोरेल गाड्यांमध्ये सामानाचा आकार आणि वजन यासंबंधीचे सध्याचे नियम अडचणीचे आहेत. त्यामुळे आम्हाला जेवणाच्या डब्यांची वाहतूक करणे कठीण झाले आहे. हे फक्त डब्बावाल्यांच्या बाबतीत नाही; मुंबईतील कामगार वर्गासाठी ही अडचण आहे.

डबेवाला ही मुंबईची ओळख आहे. ते हजारो कार्यालयीन कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सेवा देतात मात्र मेट्रो आणि मोनोरेलमधून सामानाचे डबे नेण्यासाठी त्यांना अडथळा येत आहे. आम्ही मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये टिफिन वितरीत करतो, उपनगरात प्रवास करतो, तरीही आम्हाला मुंबई मेट्रो किंवा मोनो रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा नाही, असे तळेकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in