दर्जेदार व टिकाऊ रस्त्यांसाठी नामांकित कंपन्यांना कामे द्या,भाजपचे आमदार अमित साटम यांची मागणी

खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी दीड हजार कोटींच्या घरात खर्च करण्यात येतो.
दर्जेदार व टिकाऊ रस्त्यांसाठी नामांकित कंपन्यांना कामे द्या,भाजपचे आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबईकरांना दर्जेदार व टिकाऊ रस्ते मिळावेत, यासाठी रस्त्यांची कामे कंपन्यांना कामे द्या, यासाठी निविदा प्रक्रियेत बदल करा, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

रस्तेकामांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात; मात्र मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असते. खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी दीड हजार कोटींच्या घरात खर्च करण्यात येतो. कोट्यवधी रुपयांचा खर्च हा करदात्या मुंबईकरांच्या पैशांतून करण्यात येतो; मात्र मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे सुस्थितीत असतात. त्यामुळे यापुढे रस्तेबांधणी करताना नामांकित कंपन्यांना निविदा प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी काही सूचना केल्या आहेत. प्रत्येक रस्त्याच्या छोट्या-छोट्या निविदा काढण्याऐवजी पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व शहर भागासाठी अशा केवळ तीनच निविदा काढाव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच निविदेतील अटी अशा असाव्यात की, त्यामुळे केवळ केंद्र सरकारसोबत महामार्ग तयार करणाऱ्या नामांकित कंपन्याच त्यामध्ये सहभागी होऊ शकतील, असेही साटम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in