अंधेरीतील गोखले पुलाला मुहूर्त मिळाला; एक मार्गिका फेब्रुवारी अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुली होणार

अंधेरीतील गोखले पुलाला मुहूर्त मिळाला; एक मार्गिका फेब्रुवारी अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुली होणार

अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर डिसेंबरमध्ये स्थापित करण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाला वेग आला

मुंबई : अंधेरीतील गोखले पुलाचा पहिला गर्डर पालिकेच्या पूल विभागाने यशस्वीरीत्या स्थापन (लॉन्च) केल्यानंतर या पुलाच्या कामाला आता वेग आला आहे. पुलाच्या एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून फेब्रुवारी अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुली होणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. दरम्यान, एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असले तरी मार्च अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुली होणार, असा दावा भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे.

अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर डिसेंबरमध्ये स्थापित करण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाला वेग आला आहे. पुलाची एक मार्गिका फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सेवेत येईल, असे म्हटले जाते होते. मात्र एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून काही तांत्रिक कामे बाकी असून फिनिशिंगचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच एस. व्ही. रोड बाजूच्या अॅक्सेस आणि मॅस्टिक लेयरचे काम सुरू आहे. या कामाला ८ ते १० दिवस लागू शकतात. हे काम पूर्ण झाल्यावर पूल दुतर्फा वाहतुकीसाठी खुला केला जाईल. त्यामुळे मार्चमध्ये हा मार्ग सेवेत येईल, अशी शक्यता साटम यांनी व्यक्त केली आहे.

पुलाची लांबी- रेल्वे भूभागात- ९० मीटर

रेल्वेबाहेर - पूर्वेस २१० मीटर, पश्चिमेस - १८५ मीटर

पुलाची रुंदी - (रेल्वे भूभागात) - १३.५ मीटर

रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह - १२ मीटर (दोन्ही बाजूस)

एकूण रुंदी - २४ मीटर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in